रायगड जिल्ह्यातील ३१ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन
अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) ः शासनाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे शिक्षकांची निश्चिती दरवर्षी केली जाते. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात मराठी माध्यमाच्या २६ व उर्दू माध्यमाच्या पाच अशा एकूण ३१ शिक्षकांची जिल्हा स्तरावर समायोजन प्रक्रिया रायगड जिल्हा परिषदेत शुक्रवारी (ता. १०) यशस्वीरीत्या पार पडली. प्रक्रियेदरम्यान शिक्षकांना त्यांच्या पसंतीनुसार व सोयीच्या ठिकाणी शाळा निवडण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे अनेक शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रक्रियेदरम्यान शिक्षकांच्या सोयी, अंतर, गरज आणि उपलब्ध जागा या सर्व बाबींचा विचार करून समायोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी समायोजनाची आवश्यकता स्पष्ट करताना विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षकांचे योग्य समायोजन करणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, कृषी सभापती वैकुंठ पाटील, समाजकल्याण सभापती नारायण डामसे आणि जिल्हा परिषद सदस्य अमित नाईक यांनीही या प्रक्रियेत पारदर्शकतेवर भर दिला.
प्रशासनाच्या पातळीवर नेहा भोसले व शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी समन्वय साधत संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण केली. या वेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय कवितके, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुनील भूरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक)चे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे आणि विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चौकट
विशेष म्हणजे पवित्र प्रणालीद्वारे २०२४ मध्ये सेमी इंग्रजी माध्यमातील १० शिक्षण सेवकांची नियुक्ती उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये करण्यात आली होती. या शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीशी सुसंगत अशा मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये नियुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या वेळी घेण्यात आला. या निर्णयामुळे संबंधित शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.