मुंबई

सत्पाळा-राजोडी उघाडीच्या बांधकामाची महापौर-उपमहापौरांकडून तातडीने पाहणी

CD

सत्पाळा-राजोडी उघाडीच्या बांधकामाची महापौर-उपमहापौरांकडून तातडीने पाहणी

विरार, ता. १३ (बातमीदार) : सत्पाळा-राजोडी बंधारा येथे खारभूमी विभागामार्फत सुरू असलेल्या उघाडीच्या बांधकामाबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रारीचा पाढा वाचल्यानंतर, सोमवारी (ता. १३) महापौर अजीव पाटील आणि उपमहापौर मार्शल लोपीस यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी केली. या उघाडीचे बांधकाम करताना तळाची योग्य लेव्हल राखली गेली नसल्याचे लोकप्रतिनिधींच्या पाहणीत स्पष्ट झाले असून, यामुळे परिसरातील पाणी निचरा होण्याच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या नाल्यातून वटार, नवापूर आणि सत्पाळा हद्दीतील पावसाळी पाण्याचा मोठा निचरा होत असतो. मात्र, सध्याच्या सदोष बांधकामामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना जलमय परिस्थितीचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन महापौर आणि उपमहापौरांनी संबंधित विभागाला तातडीने नाल्याची खोदाई करून त्याचे रुंदीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेळेत योग्य लेव्हल आणि रुंदीकरण करण्यात आले नाही, तर भविष्यात मोठी समस्या उद्भवू शकते, असा इशाराही या वेळी प्रशासनाला देण्यात आला. या पाहणीमुळे खारभूमी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांच्या हितासाठी तातडीने सुधारणा करण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रसंगी नगरसेवक डॉमनिक रुमाव व बहुजन विकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी-कार्यकर्ते हेदेखील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT