मुंबई

नेरूळ जेट्टीवर पर्यटकांसाठी कायाकिंग खुले!

CD

सागरी साहसाची नेरूळमध्ये परीक्षा
जेट्टीवरील कायाकिंग खुले, पर्यटनाला चालना
बेलापूर, ता. १३ (बातमीदार)ः नवी मुंबई शहराला उद्याने, चहूबाजूला खाडी परिसर लाभलेला आहे. बेलापूर जेट्टीनंतर नेरूळ जेट्टीवरील कायाकिंगसारख्या सागरी खेळातून पर्यटकांच्या साहसाची परीक्षा सुरू आहे.
कायाकिंग म्हटले की गोवा डोळ्यासमोर उभा राहतो. गोव्यात अशा खेळांसाठी विशिष्ट परिसर आहे. मात्र, नवी मुंबईत खाडी परिसरात पहिल्यांदाच कायाकिंग राईड सुरू झाली आहे. गोवा, कोकण परिसरात १५ वर्षांपासून अधिक काळ सागरी साहसी खेळ पर्यटकांना उपलब्ध करणाऱ्या कोकण एक्सप्लोररच्या माध्यमातून पहिल्यांदाच नवी मुंबईतील नेरूळ जेट्टीवर रविवार (ता. १२) कायाकिंग राईड पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली आहे.
---------------------
ठाणे, मुंबईतील पर्यटक दाखल
कोकण एक्सप्लोरर संस्थेने महिन्याभरापूर्वी नेरूळ जेट्टीवर येऊन कायाकिंग राईडची पाहणी केली. पाण्याची खोली, भरती, ओहोटी, सुरक्षिततेची पाहणी केली. त्यानंतर रविवारी पहिली राईड खुली करण्यात आली. या वेळी ठाणे, मुंबई, नवी मुंबईतून कायाकिंग राईडसाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
------------------------
कालवधी प्रति व्यक्ती
४५ मिनिटे - ९५०
७५ मिनिटे - १,८००
-----------------------
नवी मुंबई शहरातील नागरिकांना एक साहसी अनुभव देण्यासाठी आलो आहोत. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे आमचे कर्तव्य असून, त्यानुसार विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
- पूनम रीबो, सह संस्थापक, कोकण एक्सप्लोरर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT