मुंबई

गॅस टंचाईमुळे डहाणूतील हॉटेल-टपरी व्यवसाय अडचणीत

CD

गॅसटंचाईमुळे डहाणूतील हॉटेल-टपरी व्यवसाय अडचणीत
पर्यायी उपायांनी सुरू ठेवला उदरनिर्वाह

कासा, ता. १३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात सध्या इंधनटंचाई, दरवाढ आणि व्यावसायिक वापरासाठी मिळणाऱ्या गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे महामार्ग व राज्य मार्गालगत असलेल्या हॉटेल, टपऱ्या आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर मोठे संकट ओढवले आहे. गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्थानिक व्यवसायांवरही दिसून येत असून, गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने अनेकांना आपला व्यवसाय तात्पुरता बंद ठेवावा लागला होता.

डहाणू तालुक्यातील विविध भागांमध्ये हॉटेल व टपरी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. मात्र, गॅसटंचाईमुळे स्वयंपाकासाठी आवश्यक इंधनच उपलब्ध नसल्याने व्यावसायिकांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. काहींनी दोन-तीन दिवस हॉटेल बंद ठेवले, तर काहींनी पर्यायी उपायांचा अवलंब करत पुन्हा व्यवसाय सुरू केला. उपजीविका खंडित होऊ नये म्हणून अनेक व्यावसायिकांनी लाकूडफाटा, कोळसा तसेच इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर सुरू केला आहे. काही ठिकाणी पारंपरिक चुली पुन्हा पेटवल्या गेल्या असून, स्थानिक पातळीवर उपलब्ध लाकूड आणि कोळशावर स्वयंपाक केला जात आहे, तर काहींनी पंख्याच्या सहाय्याने चालणाऱ्या कोळशाच्या शेगड्या तयार करून त्यावर चहा, नाश्ता व जेवण बनवण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास शासनाकडून दंडात्मक कारवाई होऊ शकते, त्यामुळे अनेकांनी तो पर्याय टाळत इतर मार्ग शोधले. काही काळ तर लाकूडफाटा व कोळशावर चालणाऱ्या शेगड्यांचीही टंचाई जाणवू लागली होती. यासंदर्भात बोलताना हॉटेलचालक चिंगी गुप्ता यांनी सांगितले की, गॅसटंचाईमुळे एक-दोन दिवस हॉटेल बंद ठेवावे लागले. मात्र, ही समस्या कधी संपेल हे स्पष्ट नसल्याने आम्ही कोळशावर चालणारी शेगडी तयार केली. सध्या त्यावरच सर्व खाद्यपदार्थ तयार करून व्यवसाय सुरू ठेवला आहे. धूर व उष्णतेचा त्रास होतो, पण पोटापाण्यासाठी धंदा सुरू ठेवणे गरजेचे आहे.

गॅसटंचाईमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत डहाणूतील लघु व्यावसायिकांनी जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर पर्यायी उपाय शोधत आपला व्यवसाय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. मात्र, लवकरात लवकर गॅसपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा सर्व व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT