मुंबई

३ कोटी ५१ लाखाचा चुना

CD

वरिष्ठ अधिकाऱ्याची अफरातफर
नामांकित कंपनीला तीन कोटी ५१ लाखांचा गंडा
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : घणसोली एमआयडीसीतील नामांकित कंपनीत वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्याने कंपनीला तब्बल तीन कोटी ५१ लाख ८७ हजारांचा गंडा घातला. या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी निखिल अजमानी फेब्रुवारी २०२२ पासून मोमेंटम सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीत फायनान्स मॅनेजर म्हणून कामाला लागला होता. वरिष्ठ पदावर असलेल्या अजमानीकडे कंपनीच्या बँक खात्यातून अन्य कंपन्यांना पैसे देण्यासाठी इंटरनेट बँकिंगचे एक्सेल शीट अपलोड करण्याचे अधिकार होते. याच अधिकाराचा गैरवापर करीत आरोपीने जुलै २०२३ पासून व्हेंडर कंपन्यांच्या नावासमोर एक्सेल शीटमध्ये स्वत:च्या बँकेचे खाते क्रमांक टाकून पैसे स्वत:च्या खात्यावर वळवण्यास सुरुवात केली. फसवणूक उघड होऊ नये, यासाठी आरोपीने विप्रो लि. आणि नगारो सॉफ्टवेअरसारख्या कंपन्यांचे बनावट इनव्हॉइस तयार करून कंपनीच्या फायनान्स डिपार्टमेंटला पाठवले. तसेच कंपनीच्या अधिकृत क्रेडिट कार्डचा वापर करून ३.५८ लाख रुपये स्वत:च्या खात्यात वळवून घेतले. पण या कंपन्यांसोबत असलेल्या काही व्हेंडर कंपन्यांनी पैसे मिळाले नसल्याची तक्रार केली. त्यानंतर तब्बल तीन कोटी ५९ लाख ८७ हजारांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले.
------------------------
असा झाला भांडाफोड...
कंपनीने त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर ७८ लाख २३ हजार रुपये घेतल्याचे कबूल केले. तसेच रक्कम काही दिवसांत परत करण्याचे आश्वासन ईमेलद्वारे दिले. त्यापैकी फक्त आठ लाख रुपये अजमानीने परत केले. मात्र उर्वरित साडेतीन कोटींहून अधिक रक्कम घेऊन त्याने पलायन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT