मुंबई

अलिबागमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याची मोहीम

CD

अलिबागमध्ये अतिक्रमण हटविण्याची मोहीम
अलिबाग, ता. १३ (वार्ताहर) ः शहरातील मुख्य रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या अतिक्रमणावर आळा घालण्यासाठी नगरपालिकेने विशेष मोहीम उघडली आहे. यानुसार विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या हातगाड्या आणि अनधिकृत होर्डिंग हटविण्याच्या कारवाईला वेग दिला आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, पादचाऱ्यांना मोकळा पदपथ उपलब्ध होणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बाजारपेठा, बसस्थानक परिसर, शहरातील चौक आणि समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर हातगाड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली होती. याशिवाय, अनेक व्यापाऱ्यांनी जाहिरातीसाठी अनधिकृतपणे होर्डिंग्ज उभारल्याने शहराचे विद्रुपीकरण झाले होते. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने विशेष पथक स्थापन करून कारवाईला सुरुवात केली. यानुसार नियमबाह्य हातगाड्या हटविण्यात आल्या असून, परवानगीशिवाय लावलेली होर्डिंग्जही काढून टाकण्यात आली. नगरपालिकेने सर्व संबंधितांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

शहरामध्ये ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण काढण्याचे काम सुरू झाले आहे. यापुढेही अशी मोहीम सुरूच राहणार आहे. त्यामुळे अतिक्रमण अथवा अनधिकृतपणे होर्डिंग लावल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
- ॲड. मानसी म्हात्रे, उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

SCROLL FOR NEXT