मुंबई

चहा कॉफी प्रेमींच्या खिशावर कात्री

CD

चहा-कॉफी प्रेमींच्या खिशावर कात्री
खाद्यपदार्थांचादेखील भाव वधारला

वसई, ता. १३ ( बातमीदार) : घरातून बाहेर पडताच टपरीवर जाऊन, चहा, कॉफीचा आस्वाद घेणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत, तर गरमागरम नाश्ता करण्यासाठी देखील दुकानात गर्दी होत असते. मात्र, व्यावसायिक सिलिंडरसाठी लागणारा जास्तीचा अवधी पाहता चहा, कॉफीसह खाद्यपदार्थांचे भाव वाढले असल्याचे वसईत पाहावयास मिळत आहे. यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसली असून, खवय्येही आता या पदार्थांपासून दोन हात लांब राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.

वसई-विरार शहरात चाकरमानीवर्ग मोठ्या प्रमाणात औद्योगिक वस्तीत कामानिमित्त ये-जा करतात. खासगी कार्यालये, व्यापारी दुकानेदेखील येथे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे रोज चहा, कॉफीसाठी मागणी असते. सामोसा, वडा यासह अन्य खाद्यपदार्थांकडे नागरिकांचा कल असतो, परंतु हे तयार करण्यासाठी लागणारा सिलिंडर मिळवण्यासाठी अधिक वेळ लागत आहे, त्यामुळे इंडिक्शन किंवा अन्य युक्ती वापरून चहा, कॉफी, खाद्यपदार्थ तयार करून ग्राहकांना विक्री केले जात आहेत. बऱ्याच चहा-कॉफी टपरीवर तसेच खाद्यपदार्थ दुकानात भाव वाढ झाल्याचे दिसून येत आहे. येथे सामोसा हा पूर्वी १५ ते १७ रुपयांना मिळत होता. मात्र, आता तो २० रुपये झाला आहे, तर वडा व अन्य खाद्यपदार्थांतदेखील दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली असून, चहा मागे पाच ते सात रुपये भाव वाढला आहे.

ग्राहकांच्या मागणीचा पुरवठा व्हावा, म्हणून आम्ही विजेवर चालणाऱ्या शेगड्या व इतर साहित्यांचा वापर करून अन्नपदार्थ तयार करत आहोत, पण या सर्व गोष्टी करताना थोडा खर्च वाढत आहे. त्यामुळे आम्ही काही पदार्थ्यांच्या भावात वाढत केली असल्याचे मत दुकानदारांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT