नवीन पनवेलमध्ये भीमोत्सव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
कामोठे, ता. १३ ( बातमीदार) : नवीन पनवेल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सहा दिवसांचा भीमोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. भाजप व जयंती उत्सव समिती तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने १० ते १५ एप्रिलदरम्यान हा उत्सव साजरा होत आहे.
या भीमोत्सवात मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, मैदानी खेळ, महिलांसाठी संगीत खुर्ची व खेळ पैठणी, तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी धम्म ध्वजारोहण, प्रवचन व स्नेहभोजनाचा कार्यक्रम बिनेदार कॉर्नर येथे होणार आहे.
सायंकाळी गायक आनंद शिंदे यांचा ‘शिंदेशाही बाणा’ हा भीमगीतांचा कार्यक्रम आणि बुधवारी साजन विशाल यांचा विशेष गायन कार्यक्रम सेक्टर २ येथे होणार आहे. या भीमोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक ॲड. प्रकाश बिनेदार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.