मुंबई

भारती विद्यापीठात ‘माईंड्स’ आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

CD

भारती विद्यापीठात ‘माईंड्स’ आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी
अनिश्चिततेत यशासाठी लवचिकता व अनुकूल नेतृत्वावर भर; देश-विदेशातील तज्ज्ञांचा सहभाग
खारघर, ता. १३ (बातमीदार) : खारघर येथील भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय)च्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजतर्फे ‘माईंड्स २०२६’ ही दुसरी आंतरराष्ट्रीय परिषद हायब्रिड पद्धतीने यशस्वीपणे पार पडली. ‘अनिश्चिततेत यशस्वी होण्यासाठी लवचिकता आणि अनुकूलन क्षमता’ ही या परिषदेची मध्यवर्ती थीम होती.
परिषदेचे उद्‍घाटन संयोजक डॉ. मोना सिन्हा यांच्या हस्ते झाले. त्यांनी परिषदेचा उद्देश स्पष्ट करताना जागतिक बदलांच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्ष व अधिष्ठाता डॉ. प्रेमसिश रॉय यांनी अनिश्चित व्यावसायिक वातावरणात लवचिक आणि अनुकूल नेतृत्वाची गरज अधोरेखित केली.
या परिषदेत ऑस्ट्रेलियातील सदर्न क्रॉस विद्यापीठाच्या प्रा. दर्शना सेडेरा यांनी ‘अराजकता सिद्धांत’ विषयावर मार्गदर्शन केले. तसेच श्रीलंकेतील किवू विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सजीवानी लियाना अरच्ची, एक्सट्रॅक्ट टेक ऑस्ट्रेलियाचे सीईओ ल्यूक ग्रासियास आणि विप्रोचे कार्यकारी संचालक संजय राय यांसह अनेक मान्यवर सहभागी झाले.
आठ ट्रॅकमधील तांत्रिक सत्रांमध्ये २०५ संशोधकांनी ८५ हून अधिक शोधनिबंध सादर केले. समारोपावेळी विविध उत्कृष्ट संशोधन कार्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

चौकट
हायब्रिड पद्धतीमुळे जागतिक सहभागाला चालना
हायब्रिड पद्धतीचा प्रभावी वापर ही या परिषदेची विशेष बाब आहे. यामुळे देश-विदेशातील संशोधकांना सहज सहभाग घेता आला. शैक्षणिक देवाणघेवाण, नेटवर्किंग आणि जागतिक सहकार्य वाढवण्यास मोठी चालना मिळाली. बदलत्या काळात डिजिटल माध्यमातून संशोधन आणि ज्ञानविनिमय अधिक व्यापक करण्याचा संदेश या परिषदेतून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT