मुंबई

वागळे इस्टेटमध्ये किरकोळ कारणावरून मारहाण

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : वागळे इस्टेट परिसरात कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून शेजाऱ्याने दोन भावंडांवर लाकडी बांबूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जखमी तथा तक्रारदार मेहबुब अब्बास अली खान (वय ३०) हे कुटुंबासह वागळे इस्टेट परिसरातील नेहरूनगर येथे वास्तव्यास आहे. ते रविवारी (ता. १३) मध्यरात्रीच्या सुमारास कामावरून घरी आले असता शेजारी गोविंद प्रसाद यांची मुलगी घरासमोर कचऱ्याचा डबा घेऊन खेळत होती. कचरा सांडत असल्याने मेहबुब यांनी तिला तेथे खेळू नये, असे सांगितले. याच कारणावरून काही वेळातच गोविंद प्रसाद हा संतप्त झाला. त्याने मेहबुब यांना शिवीगाळ करत मारहाण केली. झटापटीदरम्यान त्याने लाकडी बांबूने मेहबुब यांच्या डोक्यावर प्रहार केला. मदतीला आलेल्या त्यांचा भाऊ यासिन यालाही मारहाण करण्यात आली. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT