मुंबई

जुईनगर परिसरात अग्निशमन केंद्र उभारण्यास मंजूरी

CD

जुईनगर परिसरात अग्निशमन केंद्र उभारण्यास मंजुरी
माजी नगरसेवक रंगनाथ औटी यांच्या पाठपुराव्याला यश
जुईनगर, ता. १३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नेरूळ विभागातील सेक्टर २, भूखंड क्रमांक ३० येथे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यास प्रशासकीय तसेच आर्थिक मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी माजी नगरसेवक रंगनाथ औटी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर जुईनगर, नेरूळ आणि आसपासच्या भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्राची गरज अनेक वर्षांपासून जाणवत होती. उंच इमारती, निवासी संकुले, व्यापारी आस्थापना आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद मिळणे अत्यावश्यक बनले होते. आग, स्फोट, शॉर्टसर्किट किंवा इतर दुर्घटनांच्या वेळी अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून वारंवार मागणी करण्यात येत होती. अखेर प्रशासनाने या मागणीची दखल घेत मंजुरी दिल्याने हा निर्णय नागरिकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. यासंदर्भात स्थानिक शिवसेना नगरसेविका शशिकला औटी आणि माजी नगरसेवक रंगनाथ औटी यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
आता या प्रकल्पाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष बांधकाम प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन अग्निशमन केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित व्हावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नवीन केंद्र सुरू झाल्यानंतर जुईनगर, नेरूळ आणि परिसरातील नागरिकांना अधिक सुरक्षित, तत्पर आणि सक्षम अग्निसुरक्षा सेवा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT