पालिकेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी कामे प्रगतिपथावर : महापौर
वसई, ता. १३ (बातमीदार) : वसई-विरार शहर आणि गावांत ज्या ठिकाणी नळजोडणी नाही किंवा कमी दाबाने, अनियमित पाणीपुरवठा होत आहे, त्या भागात पाणी कसे मिळेल यावर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी गावागावात जलवाहिनी अंथरण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. त्यानंतर सामूहिक नळजोडणी करून पाणी देण्याची कार्यवाही त्वरित केली जाईल, असे आश्वासन महापौर अजीव पाटील यांनी नालासोपारा गास येथे जलवाहिनी भूमिपूजनप्रसंगी दिले.
वसई-विरार महापालिकेअंतर्गत येणाऱ्या गास गावात महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलवाहिनी टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. या वेळी माजी सरपंच सालू आल्मेडा, सायमन आल्मेडा, चंद्रकांत वळवी, जो अल्फान्सो, जोसेफ पेन, शमा डिमेलो, गॉडसन रॉड्रीग्स यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताची कामे हाती घेऊन अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. तसेच शहरात नव्या संकल्पनादेखील राबविण्यात येतील, असे या वेळी उपमहापौर मार्शल लोपीस यांनी सांगितले. या वेळी गावातील महिलांनी महापौर व उपमहापौरांची भेट घेऊन परिसरात सुरू असलेल्या विकासकामांबद्दल आनंद व्यक्त केला.
-----------
परिसरातील समस्यांचा आढावा
महापौर अजीव पाटील व उपमहापौर मार्शल लोपीस यांनी तलावाची पाहणी केली. या वेळी तलावाची स्वच्छता करून नागरिकांच्या सूचनांनुसार त्याचे सुशोभीकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच गास, ग्रासियन नगर येथे पावसाळ्यात होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी लवकरच पाहणी दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे आश्वासित करण्यात आले.
------------
वसई : गास येथे जलवाहिनी अंथरण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.