मुंबई

लाखोंचे हेरॉईन उरणमधून जप्त

CD

लाखोंचे हेरॉइन उरणमधून जप्त
उरण, ता. १३ (बातमीदार)ः तालुक्यातून पोलिसांनी तब्बल दोन लाख ५२ हजार ८०० रुपये किमतीचे हेरॉइन जप्त केले असून, तिघा तरुणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत. उरण तालुक्यातील जासई येथील शीतल परिवहन पार्किंगलगतच्या झाडाखाली काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईदरम्यान रवींद्र शेठी (२७), गणेश भिडे (२५), गणेश पाटील (१९) यांना पकडण्यात आले. आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून ५.९० ग्रॅम वजनाच्या हेरॉइनच्या ८५ पुड्या जप्त करण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची दोन लाख ५२ हजार ८०० रुपये इतकी किंमत आहे.
--------------------
तीन दिवसांची कोठडी
पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकॉट्रोपिक सबस्टन्सेस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 75,000 पार, Suzlon फोकसमध्ये; पाहा महत्त्वाचे अपडेट्स

Nanded: दीड महिन्यापासून भाऊ कोमात, उपचारसाठी पैसे घेऊन निघालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू; लेक पोरकी, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Chandrapur: घरात गांजाचा साठा; चंद्रपुरात तरुण अटकेत; मातंग मोहल्ल्यात पोलिसांचा छापा; १ किलो गांजा जप्त

Ujani Dam: उजनी धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव; ‘सुपर एल निनो’मुळे पाऊस लांबणीवर, धरण उणे २१ टक्के, निर्णय राज्य शासनाच्या हाती

Chandrapur: ऑफ-ग्रीड सोलर प्रणाली सुरू करा; अंगणवाडीतील स्थिती; प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांत संताप

SCROLL FOR NEXT