कमलाकर राऊत यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
मुंबई, ता. १३ ः कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कवी व समीक्षक कमलाकर राऊत यांच्या ‘मन हे ईश्वर’ आणि ‘कवेत विसावल्या तारका’ या दोन काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. अनुयोग शिक्षण संस्थेचे अनुयोग विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सभागृह, जवाहर नगर, खार (पूर्व) येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य सतीशचंद्र चिंदरकर सर यांनी कवी व समीक्षक कमलाकर राऊत यांचे अभिनंदन केले व कविवर्य नारायण सुर्वे यांच्या ५० वर्षांपूर्वीच्या आठवणी सांगितल्या. प्रमुख पाहुणे राजीव श्रीखंडे म्हणाले की, राऊत यांच्या कविता वाचकांच्या मनावर राज्य करतात. त्यांची कविता वाचकांना जाणवते व त्यातला भाव हृदयापर्यंत पोहोचतो. पुस्तकांचे प्रकाशक प्रा. डॉ. संतोष राणे, प्रा. प्रतिभा सराफ, प्रकाश वैद्य, रविकिरण पराडकर यांनी कमलाकर राऊत यांच्या कविताविश्वावर समायोचित भाष्य केले. वंदना प्रकाशनचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनील सावंत यांनी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कविताविश्वावर समयोचित भाष्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.