मुंबई

गावसकर मैदानावर झोपडपट्टी पुनर्वसन कार्यशाळा

CD

गावसकर मैदानावर झोपडपट्टी पुनर्वसन कार्यशाळा
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : बेलापूर मतदारसंघातील झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसन प्रश्नांना दिशा देण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली सीबीडी बेलापूर येथील गावसकर मैदानावर आयोजित झोपडपट्टी पुनर्वसन कार्यशाळा उत्साहात पार पडली. आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
यापूर्वी दि. १७ फेब्रुवारी रोजी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या दालनात झोपडपट्टी पुनर्वसनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. त्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आणि नागरिकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एमएमआर एसआरए) ठाणे येथील उपमुख्य अभियंता राजकुमार पवार तसेच सक्षम प्राधिकारी मिनल पालांडे यांनी पुनर्वसन योजनांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये पुनर्वसन प्रक्रियेतील टप्पे, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष, तसेच शासनाच्या धोरणांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेला स्थानिक नागरिक, झोपडपट्टीधारक, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळणार असून, पात्र लाभार्थ्यांना घर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास नगरसेविका भारती कोळी, पूनम पाटील, सरोज पाटील, नगरसेवक अमित पाटील, माजी विरोधी पक्षनेते पंढरीनाथ पाटील, माजी नगरसेवक अशोक गुरुखे, दि. ना. पाटील, भाजप नेते निलेश म्हात्रे, तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT