तरुण वारकऱ्यांची नर्मदा परिक्रमा सुफळ संपूर्ण
३,५०० किमी अनवाणी प्रवासाची यशस्वी सांगता
तुर्भे, ता. १३ (बातमीदार ): नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परतलेल्या वारकरी संप्रदायातील भाविकांचे कोपरखैरणे येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. अवघ्या २२ व्या वर्षी १०८ दिवसांची सुमारे ३५०० किलोमीटरची खडतर, अनवाणी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे हभप विशाल पाटील आणि पखवाज वादक हभप धनंजय वेटा यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या परिक्रमेस २२ डिसेंबरला प्रारंभ झाला आणि परिक्रमा पूर्ण करून शनिवारी (ता. ११) त्यांचे कोपरखैरणे गावात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी गणेश मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली होती. हनुमान प्रासादिक हरिपाठ मंडळ व विठ्ठल- रखुमाई वारकरी संप्रदाय सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरखैरणे प्रवेशद्वारापासून या मिरवणुकीचे आयोजन केले होते. पुढे राधाकृष्ण मंदिरातून दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी ढोल-ताशे, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘नर्मदे हर’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
या वेळी नगरसेविका अनिता पाटील यांच्या हस्ते कोपरखैरणे गावातील श्री हनुमान मंदिरात नर्मदा परिक्रमावासीयांचे स्वागत करण्यात आले. ग्रामविकास मंडळ, विठ्ठल-रखुमाई हरिपाठ मंडळ, दिंडी क्रमांक १८८ मधील महिला तसेच ग्रामस्थ आणि अविनाश पाटील यांच्या परिवाराच्या वतीनेही या परिक्रमावासीयांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी नवी मुंबईतील पहिले नर्मदा परिक्रमा करणारे कीर्तनकार हभप ज्ञानराज म्हात्रे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. आपल्या कीर्तनातून त्यांनी नर्मदा परिक्रमा ही केवळ यात्रा नसून श्रद्धा, संयम आणि अध्यात्माची सर्वोच्च साधना असल्याचे सांगितले. साडेतीन ते चार हजार किलोमीटरचा पायी प्रवास करून ही परिक्रमा पूर्ण करणे म्हणजे एक प्रकारची कठोर तपश्चर्या असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.