मुंबई

तुर्भे येथील संत रामतनुमाता संवाद केंद्राची स्वच्छता

CD

तुर्भे येथील संत रामतनुमाता संवाद केंद्राची स्वच्छता
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : तुर्भे येथील संत रामतनुमाता संवाद केंद्राची अस्वच्छता आणि अन्य कारणांमुळे दुरवस्था झाली होती. अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. याची नोंद घेत तुर्भे विभाग कार्यालयातील स्वच्छता अधिकारी जयेश पाटील यांनी त्वरित या ठिकाणची स्वच्छता करून घेतली. तसेच एपीएमसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांनी या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणे मद्यप्राशन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
या संवाद केंद्रामध्ये कोणतेही विशेष कार्यक्रम होत नाहीत. या केंद्राच्या समोरच देशी दारूचे दुकान आहे. परिणामी रात्रीच्या वेळी मद्यपी या केंद्रामध्ये दारू पिऊन गोंगाट घालत असतात. तसेच अनेकदा या ठिकाणी ते लघुशंकाही करत असतात. त्यामुळे या ठिकाणी दारूच्या बाटल्या, गुटख्याची पाकिटे पडलेली होती. तसेच दुर्गंधी पसरली होती. या ठिकाणच्या लाद्या ठिकठिकाणी तुटल्या आहेत. नियमित स्वच्छतेचादेखील या ठिकाणी अभाव होता.
ही बातमी प्रसिद्ध होताच स्वच्छता अधिकारी जयेश पाटील यांनी त्वरित स्वच्छता पथकाला येथे पाठवून त्वरित सर्व स्वच्छता करून घेतली. तसेच नियमितपणे या ठिकाणी नियमित स्वच्छता राखण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले. पुन्हा या ठिकाणी अस्वच्छता आढळून आली, तर ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, येथील स्थापत्य दुरुस्ती विषयी तुर्भे विभागातील अभियंतांनी हात वर केले असून, विभाग अधिकाऱ्यांच्या कोर्टात चेंडू टोलवला आहे. विभाग अधिकाऱ्यांनी याविषयी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka CM: कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? तारीख आली समोर, डीके शिवकुमार २५वे मुख्यमंत्री होणार

Pune Civic Funds: पुणे महापालिकेला समाविष्ट ३२ गावांचा जीएसटी परतावा थकित; १८८६ कोटींअभावी पायाभूत विकास अडखळला

Latest Marathi Update Live: विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका आणि इतर मुद्द्यांवरून भोपाळमध्ये आंदोलन

तो ३०- ४० जण घेऊन माझ्या घराजवळ... पुसदमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर टोळक्याकडून हल्ला; नेमकं काय घडलं?

Karnataka CM : DK शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार; नव्या मंत्रिमंडळात कोणाला लागणार लॉटरी?

SCROLL FOR NEXT