इरशाळगडावर ट्रेकिंगला गेलेल्या तरुणाचा मृत्यू
खालापूर, ता. १३ (बातमीदार) : तालुक्यातील इरशाळगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोलो ट्रेकिंगदरम्यान तो बेपत्ता झाल्यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली. अखेर पाच तासांनंतर त्याचा मृतदेह दरीत आढळून आला. आकाश राजेंद्र वाघमोडे (२६, रा. तडाळी, भिवंडी) असे तरुणाचे नाव आहे.
आकाश रविवारी एकटाच ट्रेकिंगसाठी आपल्या दुचाकीवरून भिवंडीतून इरशाळगडावर आला होता; मात्र त्याचा काहीही मागमूस लागत नसल्याची माहिती मिळाल्यानंतर याबाबतची तक्रार खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार यांच्याकडे करण्यात आली. यानंतर सोमवारी सकाळी हेल्प फाउंडेशन, इरशाळवाडी ग्रामस्थ, पोलिस पाटील, होमगार्ड, चौक येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच पोलिस कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या पथकांमार्फत शोधमोहीम राबवण्यात आली. सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आकाशचा मृतदेह दरीत सापडला.
प्राथमिक माहितीनुसार, पाय घसरून आकाश दरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या दुर्घटना घडल्याने सोलो ट्रेकिंग धोकादायक ठरू शकते, असे हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.