मुंबई

आयुष्मान वितरणात ढिलाई

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : गोरगरीब रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार मिळावेत या उद्देशाने केंद्र सरकारची ‘आयुष्मान भारत’ योजना राबविण्यात येत असली, तरी ठाणे जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीत मोठी तफावत समोर आली आहे. जिल्ह्यातील सुमारे १३ लाख ५० हजार नागरिकांची नोंदणी झाल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात असताना, प्रत्यक्षात महापालिका क्षेत्रात केवळ ४० टक्केच कार्डांचे वितरण झाल्याची बाब उघड झाली आहे.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा मिळते. महाराष्ट्रात ही योजना ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि राज्य सरकारची ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना’ यांच्या एकत्रीकरणातून राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत सुमारे १३५६ विविध आजार व शस्त्रक्रियांसाठी मोफत उपचार उपलब्ध आहेत. योजनेशी संलग्न असलेल्या सरकारी व खासगी रुग्णालयांत या कार्डाच्या आधारे उपचार घेता येतात. या योजनेचा हेतू राज्यातील नागरिकांना गंभीर आजारांसाठी मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, जेणेकरून उपचारांचा आर्थिक भार सामान्य कुटुंबावर पडणार नाही, हा आहे. शिवाय, या कार्डाच्या मदतीने योजनेशी जोडलेल्या सरकारी किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाता येते.
ठाणे जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यानुसार, १३ लाख ५० हजार नागरिकांची नोंदणी पूर्ण झाली असून त्यांना नोंदणीची प्रत दिल्याचेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष आकडेवारी वेगळेच चित्र दाखवते. जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या हद्दीत एकूण तीन लाख ५९ हजार ७१५ आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध झाले आहेत. यापैकी केवळ एक लाख ६९ हजार ६१४ कार्डांचे वितरण झाले आहे. उर्वरित एक लाख ९० हजार १०१ कार्ड अजूनही लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

.......................
पाच लाखांच्या उपचारांची सुविधा
आयुष्मान भारत योजनेंतर्गत एका कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा मिळते. ही मर्यादा केवळ एका व्यक्तीसाठी नसते, तर ती संपूर्ण कुटुंबाला लागू होते. म्हणजेच, जर कुटुंबात चार सदस्य असतील, तर हे पाच लाख रुपयांचे आरोग्य कवच सर्व सदस्यांसाठी मिळून असते.
..................
आयुष्मान कार्ड काय आहे?
आयुष्मान भारत योजना ही विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने सुरू केली आहे. आता ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या वृद्धांचाही या योजनेच्या कक्षेत समावेश केला आहे. या योजनेंतर्गत, योजनेशी जोडलेल्या सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेता येते.


ठाणे महापलिका
आयुष्यमान कार्ड प्राप्त - १२०२७५
आयुष्यमान कार्ड वितरण- ४२२७५
वितरण प्रलंबित - ७००००
............................

नवी मुंबई महापलिका
आयुष्यमान कार्ड प्राप्त - ४२१२५
आयुष्यमान कार्ड वितरण- १५४९४
वितरण प्रलंबित - २६६३१

..........................

मिरा भाईंदर महापलिका
आयुष्यमान कार्ड प्राप्त - ५८०१४
आयुष्यमान कार्ड वितरण- ४६०८६
वितरण प्रलंबित - ११९२८

.........................

कल्याण डोंबिवली महापलिका
आयुष्यमान कार्ड प्राप्त - ६३०००
आयुष्यमान कार्ड वितरण- ५४००
वितरण प्रलंबित - ५७६००

........................
उल्हासनगर महापलिका
आयुष्यमान कार्ड प्राप्त - ७१९१७
आयुष्यमान कार्ड वितरण- ७०४६३
वितरण प्रलंबित - १४५४

......................................

भिवंडी-निजामपूर महापलिका
आयुष्यमान कार्ड प्राप्त - ५२८०
आयुष्यमान कार्ड वितरण- १५५८
वितरण प्रलंबित - ३७२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT