

Monsoon Clouds Arabian Sea mumbai kerala goa karnataka maharashtra rain
esakal
Goa Karnataka Kerala weather : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या तीव्र झळा सहन करणाऱ्या मुंबईकरांना बुधवारी (ता.०३) सकाळी पावसाने दिलासा दिला. हवामान निरीक्षणानुसार मुंबईच्या उत्तर किनारपट्टीजवळ मध्यम ते तीव्र स्वरूपाचे संवहनशील (कन्वेक्टिव्ह) ढग तयार झाले असून त्यांची उंची सुमारे ३ ते ४ किलोमीटरपर्यंत नोंदविण्यात आली आहे. या ढगांच्या प्रभावामुळे मुंबईच्या उपनगरांमध्ये पुढील काही तास हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.