मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात निघणार ६४ मिरवणूका

CD

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात ६४ मिरवणुका
वाहतूक विभागाकडून वाहतुकीत बदल
ठाणे शहर, ता. १३ (बातमीदार) ः ठाणे पोलिस आयुक्तालय परिक्षेत्रात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती साजरी होत आहे. या जयंतीत मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी सामील होणार असल्याने वाहतुकीच्या नियोजनासाठी वाहतूक विभाग सज्ज झाला आहे. ठाण्यात ६४ मिरवणुकांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असल्याने वाहतूक विभागाने वाहतुकीत बदल केले आहेत.

इथे निघणार मिरवणुका
ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील कोर्ट नाका, ठाणे रेल्वे स्थानक परिसर, खोपट, कोपरी आनंदनगर, धामणकर नाका, डोंबिवली पूर्व-पश्चिम, कल्याण फाटा, उल्हासनगर गोल मैदान, सुभाष टेकडी अशा विविध ठिकाणी मिरवणुका निघणार आहेत. या मिरवणुकांदरम्यान कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत.

सकाळी ९ ते १२ पर्यंत बदल
मंगळवारी (ता. १४) सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावर दोन्ही बाजूंकडील रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
ठाण्यातील खोपट येथून सकाळी संविधान रॅली तर कोर्ट नाका आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ आणि कोपरी भागात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

या भागांत प्रवेश बंद
- ठाणे जीपीओ, सेंट्रल मैदान, ठाणे मध्यवर्ती कारागृह मार्ग, कळवा खाडी पूल, टाॅवर नाका, टेंभी नाका, मूस चौक, डॉ. आंबेडकर रोड, दादोजी कोंडदेव स्टेडियम, अग्निशमन दल, बाजारपेठ
- डोंबिवली पूर्व-पश्चिम भागांत १० ठिकाणी प्रवेश बंदी. यात पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, पाटणकर चौक चार रस्ता, पश्चिमेकडील कोपर ब्रिज, मोठा गाव रेतीबंदर चौक, म्हसोबा चौक, ठाकुर्ली टी-पॉइंट, हनुमान मंदिर
- भिवंडी - धामणकर नाका, रांजनोली चौक, स्व. आनंद दिघे चौक, केशरबाग नाका
- उल्हासनगर - गोल मैदान नेहरू चौक, न्यू इरा चौक, शिवाजी चौक, डॉ. आंबेडकर चौक, सुभाष टेकडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, लाल चक्की चौक
- कल्याण - नेताजी सुभाषचंद्र चौक आणि कल्याण फाटा, मुंब्रा बायपास, खारेगाव, शहाड जकात नाका, प्रेम ऑटो सर्कल चौक, नेवाळी नाका, खोणी निसर्ग धाबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT