मुंबई

समाधान शिबिरात दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

CD

समाधान शिबिरात दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

कासा, ता. १३ (बातमीदार) : महसूल विभागाच्या वतीने ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उर्से येथे सोमवारी (ता. १३) उत्साहात पार पडले. पांडुरंग कोरे हायस्कूल, उर्से येथे पार पडलेल्या या शिबिरात विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांना महसूल संबंधित कामांसाठी तालुका कार्यालयात वारंवार जावे लागू नये, त्यांचा वेळ, पैसा व श्रम वाचावा, या उद्देशाने मंडळ स्तरावर अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक सक्षम करण्यासोबतच तळागाळातील व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. या शिबिराला आमदार राजेंद्र गावित, तहसीलदार सुनील कोळी, नायब तहसीलदार सीमा पुजारी, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, उपसरपंच प्रसाद पाटील, सामाजिक कार्यकर्ते हितेश पाटील, दाभोन, एना व धामटने येथील सरपंचांसह महसूल विभागाचे मंडळ अधिकारी कुमार कोंढारे व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

शिबिरात आरोग्य तपासणीसह निवासी दाखले, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, रेशन कार्ड, सातबारा उतारे, नाव नोंदणी आदी विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच अनेक लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. कृषी विभागाच्या वतीने एका शेतकऱ्याला पॉवर टिलरही प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना आमदार राजेंद्र गावित यांनी सांगितले, की ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कामांसाठी दूरवर जावे लागते; मात्र अशा शिबिरांमुळे एकाच ठिकाणी अनेक कामे पूर्ण होत असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. आपल्या जमिनी विकू नका, प्रशासन आपल्या दारी आले आहे. प्रलंबित कामे पूर्ण करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG-LPG Rate: घरगुती गॅसच्या दरांत पुन्हा वाढ! सर्वसामान्यांना मोठा फटका; आता गॅससाठी किती पैसे मोजावे लागणार?

Chhatrapati Sambhajinagar: बनावट आधार कार्ड, परदेशात व्यवहार; केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने वाळूजमधून युवकाला घेतले ताब्यात, नऊ तास चौकशी

Jalgaon: मामाच्या मुलीशी लग्न ठरलेलं, २५ वर्षीय तरुण अल्पवयीन प्रेयसीसोबत लॉजवर गेला, तिथंच आयुष्य संपवलं; तरुणीसह लॉजचालक ताब्यात

Latest Marathi Update Live: पंढरपूर कुर्डुवाडीत कुस्त्यांची दंगल

रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन ६ चा भव्य आणि दिमाखदार समारोप

SCROLL FOR NEXT