मुंबई

माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोटवर पूर्णतः बंदी; पर्यावरण समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय

CD

माथेरानमध्ये प्लॅस्टिक रेनकोटवर बंदी
पर्यावरण संवर्धनासाठी नगर परिषदेचा ऐतिहासिक निर्णय
कर्जत, ता. १३ (बातमीदार) ः पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या माथेरान गिरिस्थानचे सौंदर्य आणि निसर्ग अबाधित राखण्यासाठी माथेरान नगर परिषदेने एक मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षीच्या पावसाळी हंगामापासून माथेरानमध्ये प्लॅस्टिक रेनकोटवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. नगर परिषदेच्या पर्यावरण, पर्यटन व नियोजन समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला.
समितीची बैठक सभापती शिवाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात सोमवारी (ता. १३) पार पडली. माथेरानमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांसाठी प्लॅस्टिक रेनकोटची विक्री केली जाते. मात्र वापरानंतर हे रेनकोट जंगलात टाकून दिल्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत असल्याची बाब समोर आली होती. माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्यटनस्थळ असल्याने प्लॅस्टिकचा वापर पूर्णतः बंद करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर समितीने प्लॅस्टिक रेनकोटवर बंदी घालण्याचा ठोस निर्णय घेतला.
दरम्यान, माथेरानच्या महात्मा गांधी रोडवर मॉल रोडच्या धर्तीवर पर्यटकांसाठी बसण्याची सोय करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे बाजारपेठेचे सौंदर्य वाढण्यास मदत होईल, असा विश्वास नगरसेवक मनोज खेडकर, केतन रामाने आणि सुरेखा साळुंखे यांनी व्यक्त केला. या बैठकीला नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी समीर दळवी उपस्थित होते.

(फोटो: संग्रही असलेला पर्यटकांनी रेनकोट परिधान केलेला जुना फोटो पाठवला आहे.. चेहरे blue केले तरी चालतील.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune crime and politics: विषारी दारू, वाढते गुन्हे आणि बिघडलेली कायदा-सुव्यवस्था; पुणे पोलिस व राज्य सरकारवर सुप्रिया सुळे यांचा निशाणा

Loni Kalbhor crime news: विषारी रासायनिक ताडी प्रकरणात लोणी काळभोरमध्ये आई-मुलगा अटकेत; घातक स्फटिकांसह मुद्देमाल जप्त

Polytechnic Student Death : छ. संभाजीनगर हादरलं! "माझ्या मित्राच्या बहिणीला का छेडतोस?", संशयातून पॉलिटेक्निकच्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा निर्घृण खून, मुख्य संशयित फरार

IPL 2026, Video: एकट्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने झुंज दिली, पण संघाने साथ सोडली; अश्विनचा राजस्थान रॉयल्सवर हल्लाबोल

Palghar: स्विमिंग पूलमध्ये खेळाताना पाण्यात पडला, चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांचा मन हेलावणारा आक्रोश, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT