मुंबई

‘रुग्ण मित्र’ करणार रुग्ण व त्यांच्या कुटुंबांची मदत

CD

‘रुग्ण मित्र’ करणार रुग्ण व त्यांच्या कुटुंबांची मदत

शिवडी, ता. १३ (बातमीदार) : अवयवदानाबाबत समाजात जनजागृती वाढविण्यासाठी आणि गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळावी यासाठी ‘रुग्ण मित्र’ व साहस चॅरिटेबल ट्रस्टने संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत आता ‘रुग्ण मित्र’ हे अधिकृत गणवेश परिधान करून रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मदत करणार आहेत, अशी माहिती साहस चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रफुल्ल नवार यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

रुग्णालयामध्ये अनेकदा रुग्णाचे नातेवाईक उपचार कागदपत्र, अवयवदानाची प्रक्रिया किंवा विविध विभागपर्यंत पोहोचण्यासाठी गोंधळून जातात. अशावेळी ‘रुग्ण मित्र’ हे आधारवडासारखे त्यांच्या मदतीला धावून येतात. अवयवदानाची महत्त्वाची माहिती देणे, आवश्यक मार्गदर्शन करणे व गरजू कुटुंबांना मानसिक आधार देणे हे काम ते निस्वार्थपणे करत असतात. या वेळी प्रसन्न फाउंडेशन यांच्या पुढाकाराने हा गणवेश देण्यात आला आहे, तर आता या सेवेला अधिक संघटित स्वरूप देण्यासाठी ‘रुग्ण मित्र’ अधिकृत करणे हा निर्णय प्रसन्न फाउंडेशनच्या श्रद्धा अष्टविकर यांनी घेतला आहे. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना त्यांची ओळख सहज पटेल व गरज पडल्यास ते थेट मदत मागू शकतील असे रुग्ण मित्र विनोद साडविलकर यांनी सांगितले.

या उपक्रमामागे केवळ सेवाभाव नाही, तर अनेक रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी इच्छा दडलेली आहे. अवयवदानामुळे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनेकांना नवजीवन मिळू शकते ही भावना समाजात रुजवण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे साहस चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रफुल नवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी बरोबरी करू शकत नाही, विक्रम मोडणं दूरच''; सरन्यायाधीशांनी कुणाचं केलं कौतुक?

"राम आणि रावण समोर येणार नाहीत !" रामायण विषयी यशचा मोठा खुलासा; म्हणाला...

Latest Marathi News Live Update: जालन्यात समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात

Woman Love Relationship : सैराटपेक्षाही धक्कादायक! पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय, घरच्यांनी विष पाजलं; मृतदेह जाळला अन्, कर्नाटक -महाराष्ट्र कनेक्शन

Solapur Sugar Mills : साेलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारांना प्रशासनाचे अभय; चारशे कोटींहून अधिक थकीत, मोजक्याच कारखान्यांवर कारवाई!

SCROLL FOR NEXT