किरकोळ वादातून चौघांना मारहाण
बोईसर, ता.१४ (वार्ताहर): साईलोकनगर परिसरात किरकोळ कारणावरून दांडक्यांनी जबरी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या हल्ल्यात महिला, तिचा पती, भांडण सोडविण्यासाठी धावलेल्या दोघांसह चौघे जखमी असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
गणेशनगर येथील साईलोकनगरमध्ये रविवारी (ता.१२) रात्री ८ च्या सुमारास घटना घडली. फिर्यादी नितुदेवी दीपेंद्र ठाकुर घराबाहेर स्वयंपाक करत असताना शेजारील सुरज वेणुप्रसादने शिवीगाळ सुरू केली. तर वाद मिटवण्यासाठी आलेल्या शेखर झा यांना दांडक्याने मारहाण केली, तर संदीप झाला ठोश्याबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. या प्रकरणी बोईसर पोलिसांनी सुरज वेणुप्रसाद याच्यासह तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.