मुंबई

सहकारी सोसायटीचा धर्मदाय निधीवाटप

CD

धर्मदाय निधीवाटप कार्यक्रमाला प्रतिसाद

विरार, ता. १४ (बातमीदार) : वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा धर्मदाय निधीवाटप कार्यक्रम सोसायटीच्या बॅंक्वेट हॉलमध्ये नुकताच झाला. सदर कार्यक्रमात वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्यवस्थापक आशय हरेश्वर राऊत यांनी सोसायटीच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेतला.

त्यात त्यांनी सांगितले की, आजवर सोसायटीने विविध संस्थांना सोसायटीच्या धर्मदाय निधीमधून निधीचे वाटप केले आहे. तसेच मदत करत असताना सोसायटीने नेहमीच संस्थांची निकड किती जास्त हे विचारत घेतले आहे. सोसायटी त्यांच्या भागधारकांना आजारपणासाठी खर्च झाल्यास त्यासाठी वैद्यकीय आर्थिक मदत करत असते, असेही त्यांनी सांगितले. सहकारी सोसायटीच्या धर्मदाय फंडातून व्यवस्थापक आशय राऊत, उपव्यवस्थापक समीर पाटील व सचिव हरेश्वर राऊत यांच्या हस्ते सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ फंड संस्थेला १५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ फंड ट्रस्ट तर्फे विलास चोरघे यांनी सांगितले की, या सोसायटीने गरजु संस्थांना आर्थिक मदत देण्याचे कार्य नेहमीच केले आहे. वसतिगृहाची इमारत बांधकामच्या अंतिम टप्प्यात असताना आम्हाला निधीची अत्यंत गरज होती. त्याअनुषंगाने सहकारी सोसायटीने १५ लाखांची मदत केली, त्याबाबत आम्ही कृतज्ञ आहोत. सदर कार्यक्रमास वसई शेतकारी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT