मुंबई

‘महिला सक्षमीकरण’ मोहिमेत जिल्ह्यातील महिलांनी सहभाग घ्यावा

CD

‘सक्षमीकरण’ मोहिमेत महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन

पालघर, ता. १४ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत गुरुवार (ता. ९) पासून पुढील १५ दिवस ‘महिला सक्षमीकरण’ मोहिमेअंतर्गत व्यापक प्रसिद्धी अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश केंद्र व राज्य शासनाच्या महिलाभिमुख योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि लाभार्थ्यांच्या यशोगाथांना व्यासपीठ मिळवून देणे हा आहे.

पालघर जिल्ह्यातील ज्या महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा महिला बचत गट, कौशल्य विकास, अर्थसहाय्य योजना इत्यादी लाभ घेऊन आपले जीवन समृद्ध केले आहे, अशा महिला तसेच शासन सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिला यांनी आपली माहिती, फोटो किंवा छोटे व्हिडिओ जिल्हा माहिती कार्यालय, पालघर यांच्याकडे पाठवावेत, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, पालघर यांनी केले आहे. तसेच प्रशासनाने या महिलांना आपल्या यशकथा जिल्हा माहिती कार्यालयाच्या ईमेलवर पाठण्यास सांगितले आहे. या यशकथा स्थानिक वृत्तपत्रे, आकाशवाणी, सामाजिक माध्यमे आणि डिजिटल ई-बुकलेटच्या माध्यमातून राज्यस्तरावर प्रसिद्धी दिली जाणार आहे. महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आणि इतर महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT