विद्यार्थ्यांनी शोधक वृत्ती जपावी : स्टॅनी लोबो
विरार, ता. १४ (बातमीदार) : ज्ञानदीप मंडळ संचालित सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सत्पाळा येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष स्टॅनी लोबो यांनी याचे अध्यक्षस्थान भूषविले.
गार्डवेल इंडस्ट्रीच्या संचालिका डॉ. जॉना तुस्कानो प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात स्टॅनी लोबो म्हणाले, की आज कधी नव्हे इतकी संशोधनाची गरज निर्माण झाली आहे. कोविड काळात नवतंत्रज्ञानाची भर पडली. आज जगभर युद्धाचे वारे वाहत असताना ऊर्जानिर्मिती ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. संशोधकांनी काळानुरूप संशोधन करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपली शोधक वृत्ती जोपासायला हवी. या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष ज्यो अल्फान्सो, सेक्रेटरी ॲण्ड्रू लोपीस, महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक विल्यम रॉड्रिग्ज, सेल्फ फायनान्स प्रमुख डॉ. दीपा लोपीस आदी मान्यवर तसेच विविध महाविद्यालयातील संशोधक प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नायजेरीया विद्यापीठाचे डॉ. उकपोंग इन्हीहीबे आणि सिंगापूरच्या नीला बर्वे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्या डॉ. जॉना तुस्कानो यांच्या हस्ते शोध निबंधाच्या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. विविध भागातून १२५ संशोधकांनी शोधनिबंध पाठविले होते. उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसोजा यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. टी. एन. घोरुडे यांनी शुभेच्छापर भाषणात संशोधनाचे महत्त्व विशद केले. सहाय्यक प्राध्यापक जगदीश संसारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.