मुंबई

बीएलओच्या मानधनात वाढ व थकीत रक्कम तात्काळ द्यावी

CD

बीएलओच्या मानधनात वाढ व थकीत रक्कम तत्काळ द्यावी
- जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कासा, ता. १४ (बातमीदार) : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेचा कणा मानल्या जाणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जिल्हा शाखा पालघरच्या वतीने सोमवारी (ता. १३) जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक शाखा) गोरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संघटनेच्या शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली.

बीएलओ म्हणून कार्यरत असलेले शिक्षक व महसूल कर्मचारी आपल्या मूळ पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळून सुट्टीच्या दिवशी तसेच कार्यालयीन वेळेनंतर निवडणुकीची कामे करतात. मात्र, या कामासाठी त्यांना मिळणारे मानधन अपुरे असून, अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, बीएलओ कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांपासून वार्षिक मानधन तसेच विशेष मोहिमांचे (एसआयआर) प्रोत्साहनपर मानधन प्रलंबित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वाढत्या महागाईचा विचार करता २०२५ च्या नव्या निर्देशांनुसार मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

याशिवाय ‘बीएलओ ॲप’वर काम करताना कर्मचाऱ्यांना स्वतःचा मोबाईल व इंटरनेट वापरावे लागत असून, त्यासाठी कोणतीही शासकीय सुविधा उपलब्ध नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे शासकीय टॅब, इंटरनेट डेटा खर्च व प्रवास भत्ता देण्याची मागणीही करण्यात आली आहे. शिक्षकांवरील कामाचा ताण लक्षात घेता अशैक्षणिक कामातून सवलत द्यावी किंवा बीएलओ कामासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करावा, अशीही मागणी करण्यात आली.

दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी संघटनेच्या मागण्या रास्त असल्याचे मान्य करत, थकीत मानधन व इतर सुविधांबाबत संबंधित विभागाला सूचना देऊन लवकरच योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन या वेळी देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण ननवरे, सचिव प्रदीप गायकवाड, उपाध्यक्ष शाहू भारती, सचिन बामनकर, सचिन शेळके, ज्ञानेश्वर सरक, विकास जाधव यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT