मुंबई

गाडी बाजूला घेण्यावरून वाद पुण्यातील नऊजणांनी एकाला केली मारहाण

CD

गाडी बाजूला घेण्यावरून वाद
पुण्यातील नऊ जणांची एकाला मारहाण
श्रीवर्धन, ता. १४ (बातमीदार) : म्हसळा तालुक्यातील गोंडघर गावाजवळील एचपी पेट्रोलपंप परिसरात सोमवारी (ता. १३) किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीमध्ये झाले. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तरुणांच्या जमावाने वडवली येथील शेतकरी प्रणय किर (वय ४२) यांना मारहाण करून त्यांना जखमी केले. या प्रकारात त्यांची सोनसाखळीही तुटून गहाळ झाली आहे.
प्रणय किर हे सकाळी म्हसळाच्या दिशेने जात असताना गोंडघर येथील पेट्रोलपंपाजवळील चहाच्या टपरीसमोर एक चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला उभे होते. संबंधित वाहनचालकास गाडी बाजूला घेण्याची विनंती केली असता त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. या वेळी वाहनातील ओंकार शिवळे, वेदांत शिवळे, अभिषेक शिवळे आदींनी गाडी पुढे घेणार नाही, काय करायचे ते करा, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी किर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी उपस्थित अब्दुल घराडे (रा. कुडकी) व नासी इब्राहिम खान (रा. वडवली) हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. प्लॅस्टिक स्टूलचा वापर करून मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात प्रणय किर यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
याप्रकरणी दिघी सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार शिवळे, वेदांत शिवळे, अभिषेक शिवळे, संकेत आंद्रे, तेजस पठारे, स्वयंम नानेकर, अभिषेक यळवंडे आणि नवनाथ व गौरव यळवंडे या नऊ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व दिवेआगर येथे फिरायला आले असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मध्यरात्री अंतरवालीत घडलं मोठं नाट्य; सरकार-जरांगे चर्चेचा निकाल काय? जाणून घ्या आतली माहिती

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

'या' अभिनेत्रीच्या तोंडाचा येत होता वास, बॉबी देओलने किसिंग सीन देण्यास दिला स्पष्ट नकार, नक्की काय घडलेलं?

Gold Price Fall : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांची नफावसुली, खरेदीदारांसाठी चांगली संधी

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

SCROLL FOR NEXT