डॉ. देशमुख यांची संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी त्यागाची भावना : खासदार सुनील तटकरे
रोहा, ता. १४ (बातमीदार) ः रोह्याचे सुपुत्र डॉ. चिंतामणराव देशमुख यांनी स्वातंत्र्योत्तर काळात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन स्वाभिमानाची व त्यागाची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण केली. आज त्यांच्याच नावाने शहराच्या प्रवेशद्वारावर स्वागत कमान उभी राहिल्याचा आनंद आहे. रविवार (ता. १२) डॉ. सी. डी. देशमुख यांच्या नावाने रोहा-कोलाड रस्त्यावर स्वागत कमानीचे उद्घाटन करून ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
या वेळी खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष समीर शेडगे, नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, मुख्याधिकारी अजय एडके, गटनेते महेंद्र गुजर, सभापती महेश कोलाटकर, महेंद्र दिवेकर, राजू जैन, रवींद्र चाळके, नीता हजारे, गौरी बारटक्के, नगरसेविका स्नेहा अंबरे, नगरसेवक अजित मोरे, प्रशांत कडू, रोशन चाफेकर, माज सवाल आदींसह रोहेकर नागरिक उपस्थित होते.
तटकरे म्हणाले की, अजितदादांनी केलेले काम मी बारामतीमध्ये पाहिले आहे. बारामतीत कालवा संवर्धन हे विशेष आकर्षण आहे. अशाच प्रकारे साडेबारा कोटी रुपये खर्च करून गाझी शेख सलाउद्दीन बाबा दर्गा, अष्टमी, दमखाडी या भागातील किनाऱ्यालगत सुशोभीकरण करावे, अशा सूचना प्रशासनास दिल्या. नदी संवर्धन येथे उभारण्यात येत असलेल्या नमो उद्यानात पर्यंटकांना आकर्षित करेल असे अत्याधुनिक स्टॉल आदिती तटकरे यांच्या निधीतून उभारावे, असेही सांगितले. रोह्यातील शाळा संगणकीकृत करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तेथील जिल्हा परिषद शाळा सीबीएसई बोर्डाच्या धर्तीवर सुरू केल्या. याचप्रकारे नगर परिषद शाळा करण्यासाठी नगराध्यक्षा व सर्व सभापती नगरसेवक यांनी त्या शाळांना भेट देऊन व माहिती घ्यावी, अशा सूचना दिल्या.
फोटो कॅप्शन :
डॉ. चिंतामणराव देशमुख स्वागत कमानीचे लोकार्पण खासदार सुनील तटकरेंच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थित नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजय एडके, सर्व सभापती, नगरसेवक दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.