मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अलिबागमध्ये अभिवादन

CD

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अलिबागमध्ये अभिवादन
अलिबाग, ता. १४ (वार्ताहर) ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अलिबाग येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किशन जावळे, अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी शहरातील अनुयायी उपस्थित होते.
सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिर व मेळावा ज्येष्ठ नागरिक संघ हॉल येथे पार पडला. कार्यक्रमास राजश्री म्हात्रे, श्रीयश खरोटे आणि समाज कल्याण विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश सोरटे यांनी जेष्ठ नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT