सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : ठाणे, दिवा आणि मुंब्रा परिसरात चार अल्पवयीन मुले व मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्राथमिक तपासात वेगवेगळी कारणे पुढे येत आहेत. या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवा परिसरातील एका प्रकरणात १६ वर्षीय मुलगी घरातून मोबाईल दुरुस्तीसाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडली; मात्र ती परतली नाही. तिचा मोबाईल बंद असल्याने संपर्क साधता येत नाही. परिसरात शोध घेतल्यानंतरही ती न सापडल्याने कुटुंबीयांनी डायघर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मुंब्रा येथील दुसऱ्या घटनेत १७ वर्षीय मुलगी पहाटे ३.३० ते ५ या वेळेत कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याचे समोर आले आहे. संबंधित मुलगी चॅटिंग करत असल्याने काही दिवसांपूर्वी तिचा मोबाईल काढून घेतला होता. त्यानंतर ती बेपत्ता झाल्याने अनोळखी व्यक्तीने फूस लावल्याची शक्यता कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. याच परिसरातील आणखी एका प्रकरणात १४ वर्षीय मुलगा वाईट संगती व नशेच्या सवयीमुळे घरच्यांनी रागावल्यानंतर घरातून पळून गेल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांनी शोध घेऊनही तो अद्याप सापडलेला नाही. तसेच, बाहेरगावाहून ठाण्यात आलेली १७ वर्षीय मुलगी नातेवाइकांकडे राहत असताना सायंकाळी घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सर्व प्रकरणांचा पोलिसांकडून समांतर तपास सुरू असून, बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत केली आहेत. नागरिकांनीही कोणतीही संशयास्पद माहिती तत्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.