मुंबई

मानपाड्यात ‘नो पार्किंग’ फलकाकडे दुर्लक्ष

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : ठाणे पश्चिमेतील मानपाडा परिसरातील सुमीत सोसायटीसमोरील रस्त्यावर वाहनधारकांकडून बेकायदा पार्किंग केली जात आहे. ‘नो पार्किंग’चा फलक असतानाही रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी असल्याने सोसायटीतील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सोसायटीकडे जाणाऱ्या अँप्रोच रस्त्यावर ॲक्मे सोसायटीतील अनेक वाहनधारकांनी चारचाकी वाहने दुतर्फा उभी केली आहे. परिणामी, परिसरात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. याचा रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अन्य सेवा वाहनांना प्रवेश करणेही कठीण होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. या ठिकाणी ठाणे वाहतूक पोलिसांनी ‘नो पार्किंग’चा फलक लावलेला असतानाही नियमांचे उल्लंघन होत आहे. तक्रार मिळताच वाहतूक पोलिसांनी बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र, या कारवाईनंतर काही वाहनधारकांनी स्थानिक समाजसेवकांकडे धाव घेत विरोध दर्शविल्याने दोन सोसायट्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुमीत सोसायटीच्या रहिवाशांनी ठाणे महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडे अधिक कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

Mumbai Crime: पुण्यातील विषारी दारुचे धागेदोरे भिवंडीत, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

IPL फायनलपूर्वी RCB चाहत्यांना मोठा धक्का! सेलिब्रेशनवर पोलिसांकडून बंदी; मोठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Relationship Tips : जोडीदाराने नेहमी तुम्हाला जास्त प्रायोरिटी द्यावी असं वाटतं ना? मग नात्यात अजिबात करू नका 'या' 3 चुका

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

SCROLL FOR NEXT