मुंबई

खोडाळा बाजारपेठ बुडाली अंधारात.

CD

खोडाळा बाजारपेठ अंधारात
देयके थकल्याने वीजपुरवठा खंडित
मोखाडा, ता. १४ (बातमीदार)ः खोडाळा ग्रामपंचायतीमधील पथदिव्यांचे चार लाख ८५ हजारांचे देयक थकल्याने महावितरणने पथदिव्यांचा विद्युतपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेले खोडाळा शहर १५ दिवसाहून अंधारात चाचपडत आहे.
मोखाडा तालुक्यातील खोडाळा सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. मोखाडा नगर पंचायत झाल्यानंतर उरलेल्या ग्रामपंचायतीत आसे, खोडाळा दोन्ही ग्रामपंचायती महत्त्वाच्या मानल्या जातात. मात्र, खोडाळा ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचे देयके थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे १५ ते २० दिवसांपासून खोडाळा शहर अंधारात बुडाले आहे.
------------------------
चार लाखांची थकबाकी
या पथदिव्यांच्या वीजवाहिनीवर पाच ठिकाणी विद्युत जोडणी आहे. या पाचही मीटरची थकबाकी पाहता दोन लाख ६४ हजार, एक लाख १३ हजार, ४८ हजार, ४४ हजार १६४, २७ हजार ३७१ अशी वीजबिलांची थकबाकी चार लाख ८५ हजार ५३४ इतकी आहे. मुदतवाढीनंतर खोडाळा ग्रामपंचायतीने थकबाकी भरली नसल्याने महावितरणने वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.
----------------------------
जगदंबा उत्सवात अडचणी
खोडाळा शहराच्या सौंदर्यात पथदिव्यांमुळे भर पडते. अनेकदा शहरात वावरणे अधिक सोयीचे होते. याशिवाय चोरी होणे, छेडछाडीच्या प्रकारावर आळा बसतो, तर दुसरीकडे जगदंबा उत्सव (बोहाडा) अगदी तोंडावर आलेला पथदिवे बंद असल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
--------------------
दोन लाखांच्या आसपास देयक थकले आहे. या अगोदर जिल्हा परिषदेकडून पैसे भरले जात होते. मात्र, आता देण्यात आले नाही. यामुळे वित्त आयोगाच्या निधीतून देयके भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- देविदास दोंदे, ग्रामविकास अधिकारी, खोडाळा ग्रामपंचायत
--------------------------------------------------------------------------------
पंचायत समितीकडे स्वतःचा निधी नसल्याने पंचायत समिती पैसे देऊ शकत नाही. मात्र, जिल्हा परिषदेकडे दरवर्षीप्रमाणे पत्रव्यवहार केलेला आहे‌.
- अक्षय पगार, प्रभारी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मोखाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT