श्रीवर्धनमध्ये ‘नारीशक्ती वंदन अधिनियमा’वर मार्गदर्शन
महिलांच्या राजकीय सहभागासाठी विद्यार्थिनींना सविस्तर माहिती
श्रीवर्धन, ता. १४ (वार्ताहर) : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई संचलित महर्षी कर्वे आदर्श महिला महाविद्यालय, श्रीवर्धन येथे सोमवारी (ता. १३) ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले प्रमुख उपस्थित होते, तर ॲड. मालिका श्रीवर्धनकर यांनी विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन केले.
या अधिनियमानुसार (संविधान १२८ वी दुरुस्ती अधिनियम २०२३) लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाल्याची माहिती देत त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. नगराध्यक्ष चौगुले यांनी महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या हक्कांची अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दत्तात्रय पांडुरंग राणे होते. सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक ऋषिकेश चौगुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रंथपाल जास्मिन कदम यांनी केले.
( फोटो - विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.