मुंबई

अनधिकृत बाजारांवर महापालिकेचा धडक प्रहार

CD

पनवेल, ता. १४ (बातमीदार) : महापालिकेच्या हद्दीत वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने अखेर ठोस पावले उचलली आहेत. तळोजा आणि नावडे परिसरातील अनधिकृत आठवडा बाजारांवर सोमवारी (ता. १३) कारवाई करण्यात आली. प्रभाग अधिकाऱ्यांच्या खांदेपालटानंतर या कारवाईला वेग आल्याचे दिसून येत आहे.

महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार तळोजा येथे अतिक्रमण निर्मूलन विभागाने अनधिकृत बाजार हटवला. पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी संबंधित ठिकाणी कर्मचारी व सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. नावडे उपविभागातील घोटगाव येथे भरत असलेल्या सोमवार बाजारावरही कारवाई करीत फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी प्रभाग अधिकारी मनोज चव्हाण यांनी मोहीम राबवली. नुकत्याच झालेल्या बदलीनंतर नावडे विभागात ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. १७५ कंत्राटी कर्मचारी असूनही नियोजनाअभावी कारवाई प्रभावी होत नसल्याची टीका होत आहे. नऊ वर्षांत सर्वेक्षण न झाल्याने अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तात्पुरत्या कारवाईऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सुरक्षारक्षक तैनात
तळोजा फेज-१, सेक्टर-१० येथे सोमवारी अनधिकृत बाजारांवर अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. या ठिकाणी कारवाईनंतर पुन्हा बाजार भरला जाऊ नये, यासाठी अतिक्रमणविरोधी विभागाचे कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच उपविभाग नावडेअंतर्गत घोटगाव येथील अनधिकृत सोमवार बाजारांवर कारवाई करीत कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT