मुंबई

श्रीवर्धन येथे कोयता गॅंग सक्रिय

CD

श्रीवर्धन येथे कोयता गॅंग सक्रिय
नागरिकांत भीतीचे वातावरण
श्रीवर्धन, ता. १४ (वार्ताहर) ः श्रीवर्धन शहरात गेल्या महिनाभरापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच आता हातात कोयते घेतलेल्या टोळ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवार (ता. १४) मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास शहरात कोयता गँग दिसल्याने खळबळ उडाली आहे.
शहरातील दाबक पाखाडी परिसरात मध्यरात्री घरांची दारे ठोठावण्याचे आणि कौले वाजल्याचे आवाज आल्याने स्थानिक नागरिक घराबाहेर आले. या वेळी काळे कपडे घातलेले आणि चेहऱ्यावर रुमाल बांधलेले चार ते पाच चोरटे हातात कोयते घेऊन पळताना दिसले. चोरट्यांकडे धारदार शस्त्रे असल्याने नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र चोरटे वेगवेगळ्या वाड्यांमधून पसार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान, महिनाभरापासून शहरात चोरीचे सत्र सुरू असूनही पोलिसांच्या हाती अद्याप ठोस धागेदोरे लागलेले नाहीत. रात्रीची गस्त असतानाही चोरटे बिनधास्त वावरत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दिवसा रेकी, रात्री चोरी
चोरट्यांकडे धारदार शस्त्रे असल्याने नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र चोरटे वेगवेगळ्या वाड्यांमधून पसार होण्यात यशस्वी झाले. यावरून चोरटे दिवसात घरांची, वाड्यांवर पाळत ठेवत असल्याचा संशय व्यक्त केला.

रात्रीच्या वेळेस पोलिसांची गस्त आहे, तरी संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित पोलिस ठाण्यात संपर्क साधावा. पोलिस तातडीने हजर होतील. नागरिकांनी संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्याला पकडून मारहाण करून कायदा हातात घेऊ नये.
- सुरेंद्र गरड, पोलिस निरीक्षक, श्रीवर्धन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT