मुंबई

लैंगिक चाळे करणाऱ्या शिकवणी चालकाला अटक

CD

नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : ऐरोलीतील यादव नगरमध्ये खासगी शिकवणी चालवणाऱ्या एका तरुणाने त्याच्याकडे शिकवण्यासाठी येणाऱ्या सातवर्षीय मुलीसोबत अश्लील व लैंगिक चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कृष्णचंद्र यादव (वय २८) याच्याविरोधात रबाळे एमआयडीसी पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

कृष्णचंद्र यादव हा ऐरोलीतील यादव नगर भागात राहण्यास असून, तो त्याच परिसरात खासगी शिकवणी चालवत होता. त्यामुळे त्याच्या शिकवणीमध्ये परिसरातील अनेक लहान मुले-मुली जात होत्या. या घटनेतील सातवर्षीय पीडित मुलगीदेखील त्याच्या शिकवणीत जात होती. २३ फेब्रुवारीला सकाळी मुलगी यादव याच्या शिकवणीत गेली होती. ती एकटी असताना त्याने मुलीसोबत अश्लील व लैंगिक चाळे केले. तसेच याबाबत कोणाला काही सांगितल्यास तिला मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना दिली नाही. मात्र, गत रविवारी (ता. १२) मुलीने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी तत्काळ रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने त्याला १५ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम साबळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT