वर्तक महाविद्यालयात अभिवादन सभा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रम
विरार, ता. १४ (बातमीदार)ः वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या शिक्षक कक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली. या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक प्रा.आत्माराम गोडबोले, कवी सुनील पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे कनिष्ठ विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. हेमंत डोंगरे यांनी प्रास्ताविक मांडले. डॉ. आंबेडकर यांच्या मानवतावादी विचारसरणीने भारतीय समाजमनाला नवे अधिष्ठान दिल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा.आत्माराम गोडबोले यांनी सुरेश भट यांच्या ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना’ या भीमगीताने भाषणाची सुरुवात केली. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील अस्पृश्यतेचे अनुभव, त्यातून निर्माण झालेला अस्पृश्यता निवारणाचा संकल्प, ग्रंथप्रेम ऊहापोह केला. तसेच ग्रंथसंग्रह, शिक्षणसंस्था व कार्याशी निगडित काही आठवणी सादर केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.