मुंबई

कर्करुग्णांना आता नायरचा आधार!

CD

कर्करुग्णांना आता नायरचा आधार!
डिसेंबर २०२६ पासून रुग्णसेवा; पालिकेकडून अत्याधुनिक सेवा देण्यावर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : टाटा मेमोरियल रुग्णालयानंतर सरकारी व्यवस्थेत अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधा देणारे पहिले आणि एकमेव रुग्णालय म्हणून नायर रुग्णालय पुढे येत आहे. नायर रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या नव्या सर्वसमावेशक कर्करोग केंद्राचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, डिसेंबर २०२६ पासून रुग्णसेवा सुरू होणार आहे.
या सातमजली इमारतीत केमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि प्रगत निदान सुविधा एका छताखाली उपलब्ध होणार आहेत. सद्य:स्थितीत ७५ खाटांचे केमोथेरपी सेंटर कार्यरत असून, कर्करोग रुग्णांसाठी आवश्यक औषधोपचार दिले जातात. यासोबतच अस्तित्वातील रेडिएशन सेंटरमध्ये कोबाल्ट किरणोपचार सुविधा उपलब्ध आहे. मात्र अनेक कर्करोग रुग्णांसाठी केवळ कोबाल्ट किरणोपचार पुरेसा ठरत नाही; त्यासाठी पीईटी-सीटीसारख्या प्रगत तपासण्या आणि लिनियर एक्सेलरेटरच्या माध्यमातून रेडिएशन थेरपी देणे आवश्यक ठरते. ही गरज लक्षात घेऊन नव्या इमारतीत सर्वसमावेशक कॅन्सर सेंटर विकसित केले जात आहे.
नायर रुग्णालयातील रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाची स्थापना १९९८मध्ये झाली असून, पालिकेच्या रुग्णालयांमध्ये हा एकमेव विभाग आहे. येथे दरवर्षी ७०० ते ८०० नवीन कर्करोग रुग्णांची नोंदणी होते. सध्या दिवसाला ४० ते ५० रुग्णांना रेडिओथेरपी दिली जाते.

सातमजली इमारत
- बांधकाम मुदत - ऑक्टोबर २०२६ पूर्वी
- रुग्णसेवा मुदत - डिसेंबर २०२६ पर्यंत

अत्याधुनिक सुविधा
नव्या कर्करोग केंद्रामध्ये दोन प्रगत किरणोपचार यंत्रे, दोन कोबाल्ट आधारित ब्रॅकीथेरपी यंत्रे, सीटी सिम्युलेटर यंत्र, पीईटी-सीटी स्कॅन मशीन आणि स्वतंत्र अणुवैद्यकीय विभाग उपलब्ध असणार आहे. त्‍यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानकांनुसार अत्याधुनिक रेडिओथेरपी उपचार देता येणार आहेत.

उपचार क्षमता आणि लाभ
या केंद्रामध्ये दिवसाला २०० ते २५० कर्करोग रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता असेल, तर दररोज ८ ते १० पीईटी-सीटी स्कॅन करता येणार आहेत. प्रोस्टेट ग्रंथी, पॅनक्रियास, जठर आणि मेंदूसारख्या जटिल कर्करोगांवर प्रभावी उपचार शक्य होणार आहेत. माफक दरात अत्याधुनिक उपचार उपलब्ध होण्याबरोबरच रेडिएशनमुळे होणारे दुष्परिणामही कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नायर रुग्णालयातील हे कर्करोग केंद्र सुरू झाल्यानंतर मुंबई आणि उपनगरातील कर्करुग्णांसाठी सरकारी आरोग्य व्यवस्थेत मोठी झेप ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT