वाशीतील पदपथ फेरीवाल्यांच्या विळख्यात
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : वाशी परिसरातील पदपथांना मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचा विळखा बसला आहे. यामुळे पादचाऱ्यांना चालताना मोठी कसरत करावी लागत असून, रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागत आहे. यामुळे अपघाताची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. फेरीवाल्याविरोधात ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
वाशी-कोपरखैरणे मार्गावर नेहमीच वाहतुकीची आणि पादचाऱ्यांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत सेक्टर ९ ते १२ पर्यंत मुख्य रस्त्यालगतच्या पदपथावर सकाळपासून ते रात्रीपर्यंत फेरीवाल्यांचे बस्तान बसते. यासोबतच परिसरातील दुकानदारदेखील त्यांच्या दुकानासमोरील सामासिक जागेमध्ये वस्तू ठेवतात, तर काही दुकानदारांनी ही जागा अन्य व्यावसायिकांना पोटभाड्याने दिली आहे. परिणामी, या परिसरातून पादचाऱ्यांना चालणेही अवघड झाले आहे, तर रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना भरधाव वाहनाची घडक बसून अपघात घडण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. तसेच, या फेरीवाल्यांकडून वस्तू घेण्यासाठी मोठी गर्दी असते. या गर्दीचा गैरफायदा घेत सोनसाखळी चोरी आणि अन्य चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून रहिवाशांना फेरीवालामुक्त पदपथ चालण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.