मुंबई

पोटासाठी धोकादायक जीपप्रवास

CD

मुरबाड, ता. १४ (बातमीदार) : पोटासाठी मुरबाडकरांना दररोज कल्याण, ठाणे प्रवास करावा लागतो. यासाठी त्यांना कामावर जाण्यासाठी गरज असते ती वाहनाची. ग्रामीण भागात प्रमुख साधन म्हणजे एसटी बस. मुरबाड-कल्याणदरम्यान वेळेवर एसटी बस न सुटणे व त्यात बसायला जागा मिळणे, हे काम महाकठीण, मग पर्याय उरतो तो काळ्या-पिवळ्या जीप गाड्यांचा. या गाड्यांची प्रवासी क्षमता आहे सहा व एक चालक, मात्र या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे सुमारे १० प्रवासी कोंबले जातात.

मुरबाड-कल्याण प्रवासासाठी एसटीचे तिकीट ५१ रुपये आहे, तर जीपचे भाडे ५० रुपये घेतले जाते. कधीही वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने पोटासाठी या काळ्या-पिवळ्या गाडीत हालअपेष्टा सहन करून लोक प्रवास करतात, ही परिस्थिती गेल्या आठ-दहा वर्षांपासून या मार्गावर आहे. मात्र, विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे त्यात कोणताही बदल झालेला नाही.

दररोज प्रवासीसंख्या वाढत असतानासुद्धा एसटी महामंडळ मुरबाड-कल्याण-मुरबाड, मुरबाड-बदलापूर-मुरबाड या महत्त्वाच्या मार्गावर प्रवाशांना पुरेशा एसटी बस पुरविण्यात अपयशी ठरत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याला ही परिस्थिती बदलण्यात यश आलेले नाही, ही वास्तविकता आहे. एखादा अपघात झाला की तेवढ्यापुरता या काळा-पिवळ्या गाड्या बंद राहतात. वाहतूक पोलिस, आरटीओ कर्मचारी कारवाई केल्याचा देखावा करतात आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. या काळा-पिवळ्या गाड्या बंद झाल्या तर नोकरी, धंद्यासाठी व इतर कामासाठी प्रवास करणारे हैराण होतील. त्यांना आपल्या कामावर वेळेवर जाता देणार नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होईल, तर दुसरीकडे कर्ज काढून काळा-पिवळ्या जीप खरेदी करणारे चालक-मालक उपाशी राहतील, ही वस्तुस्थिती आहे.

सवलतीचा लाभ नाहीच!
सोमवारी झालेल्या अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला. राज्य सरकार महिलांना एसटी बसच्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देते, तरीसुद्धा काळ्या-पिवळ्या जीपने अथवा खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. नाइलाज म्हणून त्यांना खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागतो.

परवडण्याचा प्रश्न
मुरबाड-कल्याण-मुरबाड मार्गावर धावणाऱ्या काळ्या-पिवळ्या जीप अनधिकृत नाहीत. त्यांना आरटीओकडून परवानगी मिळालेली आहे, पण त्यांचा दोष आहे, तो त्या गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेण्याचा. या गाडीत परमिटप्रमाणे सहा प्रवासी घेतले, तर त्याचे भाडे तीनशे रुपये मिळते. ते जीपचालकांना परवडत नाही, तर भाडे वाढवले तर ते प्रवाशांना परवडत नाही. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेतले जातात, असे एका जीपचालकाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT