पेणमध्ये निळे झेंडे फडकवत जल्लोष
डॉ. आंबेडकर जयंतीत उत्साहात
पेण, ता. १४ (वार्ताहर) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त पेण तालुक्यात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील आंबेडकर चौकातील पुतळ्यास सकाळपासून नगरपालिका, पोलिस प्रशासन, भीमसैनिक तसेच विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संध्याकाळी पेण शहर जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत तरुण-तरुणींनी माता रमाई आणि बाबासाहेबांच्या गीतांवर नृत्य सादर करीत उत्सवात रंगत आणली. सहभागी नागरिकांनी हातात निळे झेंडे घेऊन ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. डीजेच्या तालावर नाचत आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण शहर निळे झाले होते.
या कार्यक्रमाला माजी खासदार धैर्यशील पाटील, मुख्याधिकारी जीवन पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद जाधव यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि हजारो भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.