मुंबई

घरफोडीचा छडा लावण्यात शांतीनगर पोलिसांना यश

CD

भिवंडी, ता. १४ (वार्ताहर) : खंडुपाडा परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा शांतीनगर पोलिसांनी लावला असून, शिताफीने तपास करून उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून संशयिताला अटक केली आहे. मोहम्मद आरिफ शहादुल्ला खान (वय २२, रा. गोंडा, उत्तर प्रदेश) याच्याकडून पोलिसांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ ते ६ एप्रिलदरम्यान खंडुपाडा येथील भारत कंपाउंड येथील इमारतीत राहणारे मोहम्मद शकील अब्दुल अन्सारी यांच्या घरी चाेरी झाली होती. घरातील मुख्य दरवाजा बंद करून कुटुंब बाहेरील खोलीत झोपले होते. दरम्यान, एका चोराने मागच्या बाजूच्या लाकडी दरवाजातून घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने आणि लोखंडी पेटीत ठेवलेली दोन लाखांची रोकड चोरी करून फरार झाला होता. शकील अन्सारी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर, शांतीनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून संशयिताचा शोध सुरू केला.

चोरट्याला पकडण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष पोलिस पथकाने गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे, संशयिताची ओळख मोहम्मद आरिफ शहादुल्ला खान अशी पटली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथक उत्तर प्रदेशात गेले आणि संशयिताच्या घर झडतीमध्ये पोलिसांनी दागिने आणि एक लाख ७५ हजारांची रक्कम जप्त केली. त्यानंतर तातडीने कारवाई करत संशयिताला ताब्यात घेत अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT