मुंबई

मुंबई–अहमदाबाद मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

CD

मुंबई-अहमदाबाद मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
मनोर, ता. १४ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने ही घटना घडली असून, चालक फरार झाला आहे.

मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात विजय सिंग राठोड (वय २३) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय राठोड आणि त्याचा सहकारी जव्हार तालुक्यातील काळमांडवी धरण परिसरात फिरून परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी मनोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT