मुंबई

मध्य रेल्वेकडून १६८ उन्हाळी विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा !

CD

मध्य रेल्वेकडून १६८ उन्हाळी विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १६८ अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे येथून देशातील विविध प्रमुख शहरांकडे या गाड्या धावणार आहेत.

सीएसएमटी ते चेन्नई, हैदराबाद तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस, संतरागछी आणि बंगळूर या महत्त्वाच्या मार्गांवर साप्ताहिक, द्विसाप्ताहिक आणि विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. याशिवाय पुणे ते गाझीपूर शहर आणि संतरागछीदरम्यानही विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते बनारस मार्गावरील गाड्यांना मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता असून, ७ मे ते १५ जुलै या कालावधीत द्विसाप्ताहिक गाड्या धावतील. तसेच ६ मे रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून आणि १२ जूनला बनारसहून ‘शिक्षक विशेष’ गाडी चालवण्यात येणार आहे. मुंबई-हैदराबाद आणि मुंबई-चेन्नई मार्गांवर एप्रिल ते जुलै या कालावधीत साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. तसेच बंगळूर आणि संतरागछी या लांब पल्ल्याच्या मार्गांवरही अतिरिक्त फेऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. बहुतांश गाड्यांमध्ये वातानुकूलित तसेच सामान्य श्रेणीतील डबे उपलब्ध असतील. दरम्यान, काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा ही गाडी आता संतरागछीपर्यंत धावणार आहे.

- आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू

या विशेष गाड्यांसाठी आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. काही गाड्यांचे बुकिंग सुरू झाले आहे. उर्वरित गाड्यांसाठी १५ एप्रिलपासून आरक्षण उपलब्ध होणार आहे. प्रवाशांनी आयआरसीटीसी संकेतस्थळ तसेच रेलवन ॲपद्वारे तिकीट बुकिंग व वेळापत्रकाची माहिती घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

ग्राफिक्स -
एकूण विशेष सेवा : १६८

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई - १६ फेऱ्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हैदराबाद - २४ फेऱ्या

लोकमान्य टिळक टर्मिनस - संतरागछी - ८ फेऱ्या

लोकमान्य टिळक टर्मिनस - बनारस - ४० फेऱ्या

शिक्षक विशेष (एलटीटी - बनारस) - २ फेऱ्या

लोकमान्य टिळक टर्मिनस - बंगळूर - २६ फेऱ्या

पुणे - संतरागछी - ८ फेऱ्या

पुणे - गाझीपूर शहर - ४४ फेऱ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT