मुंबई

गोरखगडावर पाय घसरून तरुणाचा मृत्यू

CD

गोरखगडावर पाय घसरून तरुणाचा मृत्यू

टोकावडे ता. १४ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील गोरखगडावर ट्रेकिंगदरम्यान पाय घसरून दरीत कोसळल्याने मुंबईतील एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गडावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष सावंत हा आपल्या पाच मित्रांसोबत गोरखगडावर ट्रेकिंगसाठी गेला होता. ट्रेकदरम्यान बॅगेतील खाद्यपदार्थ एका माकडाने उचलून नेल्याने सर्वजण त्याच्या मागे गेले. काही अंतरावर बॅग पडलेली दिसल्यानंतर ती आणण्यासाठी प्रयत्न सुरू असताना आयुष पुढे गेला; मात्र कड्याच्या उताराचा अचूक अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरला आणि तो सुमारे ५५० ते ६०० फूट खोल दरीत कोसळला, अशी माहिती मुरबाड पोलिसांनी दिली. या भीषण अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मुरबाड उपविभागीय अधिकारी अनिल लाड आणि पोलिस निरीक्षक सचिन हुंडळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार चिनवर तसेच स्थानिक रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर दुपारी उशिरा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या बचाव मोहिमेत मुरबाड पोलिस, सह्यागिरी ॲडव्हेंचर टीम आणि देहरी ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
----
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

गोरखगड परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. तसेच ट्रेकर्सनी गड चढताना आणि उतरताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन मुरबाड पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhim Jayanti: आमचा वर्षात एकच उत्सव... नियम का? भीम जयंतीत DJ बंदीवरून वरळीत नागरिक-पोलिस आमनेसामने; काय घडलं?

CSK vs KKR Live: ६, २८, ७, १५, ७! ऋतुराज गायकवाडचा खराब फॉर्म कायम; आयुष म्हात्रेला सलामीला पाठवण्याची मागणी

DA Hike 2026: डीए वाढीमुळे तुमच्या पगारात किती वाढ होईल? तुमच्या खिशात किती पैसे येतील, वाचा संपूर्ण गणित

Pune Ambegaon Leopard Rescue: भराडी वखारवाडीत दीड वर्षांची बिबट मादी पिंजऱ्यात जेरबंद; चार महिन्यांत चौथा बिबट्या पकडला

Latest Marathi News Update: पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 'हॉर्मुझ सामुद्रधुनी'च्या नाकेबंदीच्या मुद्द्यावर चर्चा

SCROLL FOR NEXT