मुंबई

खारेगावजवळ भीषण अपघात; एकाचा मृत्यू

CD

खारेगावजवळ अपघातात तरुणाचा मृत्यू
भरधाव कार ट्रकवर आदळली; तिघांची प्रकृती चिंताजनक

कळवा, ता. १४ (बातमीदार) : मुंबई-नाशिक महामार्गावर खारेगाव येथे मंगळवारी (ता. १४) पहाटे भरधाव कार ट्रकवर आदळल्याने अपघात झाला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पटेकर (वय २६) हा आपल्या सहकाऱ्यांसह वागळे इस्टेट येथील आशेर आयटी पार्कमधील काम आटपून डोंबिवलीकडे निघाला होता. त्याच्यासोबत सुजय पाटील (वय २०), राजू चिले (वय २१), सुगम जयस्वाल (वय २४) आणि स्नेहल भुसेकर (वय २३) हे होते. खारेगाव येथील नायरा पेट्रोलपंपाजवळ येताच भरधाव वेगामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जोरात आदळली. या धडकेत दीपक पटेकर याला डोक्याला आणि मेंदूला गंभीर दुखापत झाली. जखमींना तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी दीपक याला मृत घोषित केले.

अपघातात सुजय पाटील, राजू चिले आणि सुगम जयस्वाल यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, तर स्नेहल भुसेकर हिला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. कळवा पोलिस, वाहतूक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य राबवून वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT