कोस्टल रोड वाहनधारकांसाठी उपयुक्त
दोन वर्षांत तीन कोटी १६ लाख वाहने धावली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबईतील कोस्टल रोड वाहनधारकांसाठी उपयुक्त ठरला आहे. मार्च २०२४ ते मार्च २०२६ पर्यंत या दोन वर्षांत तीन कोटी १६ लाख ५९ हजार ३४३ वाहनांनी कोस्टल रोडची सफर केल्याची माहिती पालिकेने दिली.
मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पूल, भूमिगत रस्ते तयार करण्यात येत असून, कोस्टल रोड प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाचा ऑक्टोबर २०१८ मध्ये शुभारंभ झाला. त्यानंतर २०१९ पासून कोस्टल रोडच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली, तर १२ मार्च २०२४ पासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला. कोस्टल रोड प्रवासी सेवेत आल्यापासून वांद्रे ते प्रियदर्शनी पार्कपर्यंतचा प्रवास सुसाट झाला आहे. दररोज सरासरी ३२ हजार ४२५ वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे कोस्टल रोड मुंबईकरांसाठी वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी वरदान ठरला आहे. विशेष म्हणजे मरीन ड्राइव्ह ते वांद्रे सी लिंक दरम्यानचा १० किलोमीटरचा प्रवास फक्त नऊ मिनिटांत करणे शक्य झाले आहे.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. किनारी रस्त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक कामामुळे आपण परदेशात आहोत, अशी जाणीव निर्माण होते. नरिमन पाँइंटकडून उत्तरेकडे जाताना वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणाऱ्या उत्तर वाहिनी पुलाच्या आणि इतर तीन आंतरमार्गिकांच्या लोकार्पणामुळे राजीव गांधी सागरी सेतू (सी लिंक) ते वरळी मरीन ड्राइव्ह दरम्यानचा प्रवास अवघा १० ते १२ मिनिटांत होत आहे. वांद्रे येथून दक्षिण मुंबईत आणि दक्षिण मुंबईतून वांद्रे सी लिंकवरून पुढे ये-जा करण्यासाठी कोस्टल रोड महत्त्वपूर्ण ठरला आहे.
---
दररोज धावणाऱ्या गाड्या
मार्च २०२४ ते मार्च २०२६ पर्यंत ३, १६, ५९,३४३ गाड्यांनी कोस्टल रोडवर ये-जा केली.
----
रोज सरासरी ३२ हजार वाहने धावली
कोस्टल रोडवर १५ ऑगस्ट २०२५ पूर्वी दरदिवशी सरासरी दक्षिण दिशेला १९,२०९ आणि उत्तर दिशेला १५,३३० गाड्या धावत होत्या.
कोस्टल रोडवर १५ ऑगस्ट २०२५ नंतर २४ तास रोड खुला केल्यानंतर दरदिवशी सरासरी दक्षिण दिशेला ३२,४२५ आणि उत्तर दिशेला २८,५४६ गाड्या धावत आहेत.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.